Crime News: दांडिया उत्सवात जुन्या वादाचा भडका; चाकूहल्ल्यात बाप-लेकाचा मृत्यू, दोघे जखमी

Chhatrapati Sambhajinagar Crime, Dandiya Festival Attack, Father Son Death: छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून दांडिया उत्सवादरम्यान झालेल्या चाकूहल्ल्यात बाप-लेकाचा मृत्यू झाला, तर दोन मुले जखमी झाली.
Police Arrest Five Suspects After Fatal Knife Attack During Dandiya Festival in Chhatrapati Sambhajinagar

Police Arrest Five Suspects After Fatal Knife Attack During Dandiya Festival in Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : रांजणगाव शेणपुंजी येथील कृष्णानगरमध्ये जुन्या वादातून एका कुटुंबाने केलेल्या चाकूहल्ल्यात बाप-लेकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता. १९) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. दरम्यान, एमआयडीसी वाळूज पोलिसांनी दोन महिलांसह पाच जणांना छत्रपती संभाजीनगर शहरातून अटक केली. बाबासाहेब रामदास कीर्तिकर (वय ४३) आणि निहाल बाबासाहेब कीर्तिकर (वय १९) अशी मृतांची नावे आहेत, तर साहिल बाबासाहेब कीर्तिकर (वय १७) आणि कुणाल बाबासाहेब कीर्तिकर हे दोघे जखमी झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com