
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर गावात अंधश्रद्धेचा एक अघोरी आणि अमानुष प्रकार समोर आला आहे. येथील बिरोबा मंदिर परिसरात संजय रंगनाथ पगार या भोंदू बाबाने अनेक महिन्यांपासून लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत अघोरी कृत्ये केल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, वैजापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.