

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: विमान इंधनाच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती आणि वाढलेल्या परिचालन खर्चाचा फटका आता छत्रपती संभाजीनगरच्या हवाई संपर्कालाही बसू लागला आहे. देशातील आघाडीची विमान कंपनी इंडिगोने छत्रपती संभाजीनगरला जोडणाऱ्या दोन महत्त्वाच्या विमान मार्गांवरील फेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत लागू राहील.