

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवरील फुटपाथवर जागोजागी अवैध पार्किंगने कब्जा केला. येण्या-जाण्यासाठी पादचाऱ्यांना जागाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे पायी चालणाऱ्यांनी आता उडत जावे का, असा उपरोधिक प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, रोज शहरात कुठे ना कुठे पादचाऱ्यांचे किरकोळ अपघात होतात. प्रशासनाने फुटपाथवर पार्क केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.