

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: मे महिन्याच्या झळांनी जिल्ह्यातील ग्रामीण भाग होरपळून निघत असून पाण्याच्या एका थेंबासाठी जनतेला टँकरकडे डोळे लावून बसावे लागत आहे. जिल्ह्यात तब्बल १२३ टँकर साडेचार लाखांहून अधिक नागरिकांची तहान भागवित आहेत. विहिरी कोरड्या, बोअर निष्प्रभ आणि जलस्रोत आटल्याने गावोगावी पाण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.