

Chhatrapati Sambhajinagar Helmet Rule
esakal
छत्रपती संभाजीनगर: शहर पोलिस दलाने मंगळवारपासून (ता. एक) हेल्मेट सक्ती केली. पोलिस आयुक्तांच्या आवाहनानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने वाहतूक विभागाने थेट दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. पहिल्या दिवशी वाहतूक पोलिसांनी ४,१२० दुचाकीस्वारांवर ४० लाख ९१ हजार रुपयांचा दंड ठोठावला.त्यापैकी २७ हजार रुपयांचा दंड जागीच वसूल केला. आता यापुढे दंड भरण्याऐवजी या पैशांत हेल्मेट खरेदी करून स्वतःला सुरक्षित ठेवा, असे आवाहनही पोलिसांनी केले.