

Illegal flex banners have resurfaced across Chhatrapati Sambhajinagar after the municipal corporation's anti-hoarding drive slowed down.
छत्रपती संभाजीनगर : बेकायदा होर्डिंग आणि अतिक्रमणाविरोधात मोहीम राबविणाऱ्या पुणे महापालिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. दुसरीकडे, भाजपची एकहाती सत्ता आलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेत मात्र शहर होर्डिंगमुक्त करण्याची घोषणा केवळ ‘नव्याचे नऊ दिवस’ ठरली. सध्या शहरात कारवाईही नाही आणि गुन्हेही दाखल होत नसल्याने मुख्य चौकांसह गल्लीबोळ पुन्हा अनधिकृत फलकांनी विद्रूप झाले. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी काय भूमिका घेणार, याविषयी उत्सुकता आहे.