

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी मॉन्सूनपूर्व कामांचा भाग म्हणून झाडांच्या फांद्या छाटल्या जातात. यंदा मात्र अनेक नगरसेवक फांद्या छाटण्याचे नाव करून झाडांवर कुन्हाड चालविण्यासाठी प्रशासनावर दबाव आणत असल्याची माहिती समोर आली. राजकीय दबाव आणि दमदाटीमुळे उद्यान विभागासह प्रशासन हतबल झाले असून, वरिष्ठ अधिकारीही याकडे डोळेझाक करत आहेत.