

crime news
esakal
छत्रपती संभाजीनगर,: ‘तुझा नवरा दारू पितो, तू लेकराला कशी संभाळशील, माझी मुलगी बाळ विक्रीचा धंदा करते, तुझे बाळ दे तुला एक लाख रुपये देते’, असे म्हणत एका दलाल माय-लेकीने एका दांपत्याकडून एक लाख २० हजार रुपयांत एक महिना वयाच्या बाळाची (मुलगा) खरेदी केली. वाहन खरेदीच्या बॉण्डवर बाळाच्या आईची सही घेतली आणि तिच्या हातात १ लाख २० हजार रुपये दिले. त्यानंतर बाळाच्या आई-वडिलांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. महत्त्वाचे म्हणजे दलालांनी जास्त पैसे घेतले असावेत, आपल्याला केवळ १ लाख २० हजार दिले