

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: एका ४७ वर्षीय व्यक्तीवर अनोळखी व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार केले. दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या एका रिक्षाचालकाने ११२ नंबर कॉल करून पोलिसांना माहिती देत मदत केली. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. दोन) पहाटे तीनला आकाशवाणी परिसरात घडली. अब्दुल बासित हकीम खान (वय ४७, रा. कैसर कॉलनी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलेे.