Chhatrapati Sambhajinagar: अनेक मंत्र्यांशी संबंध, अन्न व नागरी पुरवठा विभागात नोकरी लावतो; तरुणाला २१ लाखांना गंडा

Job Offer Scam Exposed in Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तरुणाची 21 लाखांची फसवणूक.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: 'माझे अनेक मंत्र्यांशी संबंध आहेत, तुला सरळसेवा भरतीअंतर्गत अन्न व नागरी पुरवठा विभागात निरीक्षकपदी नोकरी लावून देतो', अशी थाप मारत विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्याला एकाने २१ लाख रुपयांचा गंडा घातला. ही घटना पाच जून ते २० जून २०२५ या १५ दिवसांत कॅनॉट प्लेस परिसरात घडली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या अभिषेक अजय सावरीकर (रा. मॉडर्न कॉलनी, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com