

Chhatrapati Sambhajinagar Traffic Issue
esakal
छत्रपती संभाजीनगर: क्रांती चौकात अनेक महिन्यांपासून जलवाहिनीला गळती लागल्याने महापालिकेने दुरुस्तीसाठी रस्ता खोदून ठेवल्याने काही तास नागरिकांना ट्रॅफिक जामचा त्रास सहन करावा लागला. गुरुवारी सायंकाळी उशिरा हे काम संपले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (ता. १४) शहरात येत असून, क्रांती चौकात त्यांची तिरंगा यात्रा येणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. १३) जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली.