Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत, जलील विरुद्ध खैरे लढतीत भुमरेंची एन्ट्री, कोण मारणार बाजी

Chhatrapati Sambhajinagar: शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदासंघामध्ये शिवसेना विरूध्द शिवसेना आणि MIM असा तिरंगी सामना पहायला मिळणार आहे.
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati SambhajinagarEsakal

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदासंघामध्ये शिवसेना विरूध्द शिवसेना आणि MIM असा तिरंगी सामना पहायला मिळणार आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडली आहे. खासकरून शिवसेनेत पडलेल्या फुटीचा या मतदारसंघात मोठा परिणाम होण्याची शक्यता अनेक राजकीय तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. शिवसेनेच्या फुटीमुळे मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी होणार असल्याने या मतदारसंघाचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान 2019 च्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात 20 वर्षे शिवसेना नेते चंद्रकात खैरे निवडून आले होते. गेल्यावेळी एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी खैरे यांचा पराभव केला होता. त्यावेळी वंचितच्या तिकीटावर इम्तियाज जलील निवडणूक लढले होते. दरम्यान यावेळी या मतदारसंघात तिहेरी लढत होत आहे. त्याचबरोबर वंचित आणि MIM एकत्रित नसल्याने वंचितने देखील या मतदारसंघात आपला उमेदवार दिला आहे. त्यामुळे मतांचा फटका कोणाला बसणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Priyanka Gandhi: "पंतप्रधान प्रचाराला आले की, लहान मुलासारखे रडतात," प्रियंका गांधींचा नंदुरबारमध्ये हल्लाबोल

यावेळी ठाकरे गटाकडून अंबादास दानवे देखील इच्छुक होते. मात्र, पक्षाकडून पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील आणि संदिपान भूमरे यांच्यात हा सामना होणार आहे. चंद्रकांत खैरे याआधी ४ वेळा या मतदारसंघातून खासदार राहिलेले आहेत.

गेल्यावेळी २०१९मध्ये चंद्रकांत खैरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणारे इम्तियाज जलील यांच्यात मोठी फाईट झाली होती. त्यामध्ये इम्तियाज जलील यांनी विजयाचा गुलाल उधळला.दरम्यान गेल्या वेळी वंतिचच्या तिकीटावर लढून जिंकलेले इम्तियाज जलील यावेळी MIMच्या तिकीटावर लढत आहेत. दरम्यान ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यावेळी सोबत नसल्याने निवडणूक वेगळी ठरण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पराभूत झालेले चंद्रकांत खैरे यांनी मतदारसंघावर आपली पकड मजबूत ठेवल्याचेही दिसून येते.

Chhatrapati Sambhajinagar
Narhari zirwal: झिरवळ अजितदादांसोबतच! मविआच्या उमेदवारासोबतच्या व्हायरल फोटोबाबत केला खुलासा म्हणाले, "लोकांच्या आग्रहाखातर...."

तर दुसरीकडे शिवसेनेने संदिपान भूमरे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांचा मतदारसंघ हा जालना आहे. शिवसेनेने या मतदारसंघात उमेदवार आयात केला आहे. याआधी या ठिकाणी भाजपकडून अतुल सावे आणि भागवत कराड यांना उमेदवारी देण्यावर चर्चा सुरू होती, मात्र, ही जागा शिवसेनेला मिळाली आणि त्यांनी पैठणमधील असलेले संदिपान भूमरे यांना उमेदवारी दिली. ते सध्या औंरगाबादचे पालकमंत्री आहेत.

Chhatrapati Sambhajinagar
Suresh Jain: निवडणूकीच्या तोंडावर सुरेश जैन यांची राजकीय निवृत्ती चर्चेत; आघाडीसाठी धक्का, महायुतीसाठी लाभदायी; निर्णयाचे कारण अनुत्तरितच

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात कोणते मुद्दे ठरणार महत्त्वाचे?

मराठा आंदोलनाचा प्रभाव या निवडणुकीवर राहण्याची शक्यता आहे.

2019 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढलेले मराठा चेहरा म्हणून पुढे आलेल्या हर्षवर्धन जाधव यांना मिळालेली मोठी मते.(अडीच लाख मतं) यावेळी देखील ते अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

मुस्लिम मतदारांची टक्केवारी 21 ते 22 टक्के एवढी आहे. तर अनुसुचित जाती- जमातीची संख्या 19 ते 20टक्के इतकी आहे. त्यांची मते निर्णायक ठरण्याची शक्यता

शांतीगिरी महाराजांचा प्रभाव काही प्रमाणात या मतदारसंघावर आहे. त्यांनी नाशिकमधून उमेदवारी मागितली होती. मात्र, त्या जागी दुसरा उमेदवार देण्यात आला त्याचा फटका काही प्रमाणात बसण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com