

Sakal Pustak Mahotsav 2026
Sakal
‘‘अभिजात भाषा म्हणून माय मराठीला दोन वर्षांपूर्वी दर्जा मिळाला, ही आनंदाची गोष्ट आहे. मराठी भाषेतही अत्यंत समृद्ध लेखन झाले असून वाचन संस्कृती वृद्धिंगत करणे गरजेचे आहे. तथापि, मराठी भाषेचे कुळ आणि मूळ शोधायचा प्रयत्न केला, तर ते मराठवाड्यातच आहे, याची प्रचिती येते. मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज यांनी ‘विवेकसिंधू’ हा मराठीतील पहिला ग्रंथ आठशे वर्षांपूर्वी याच भागात लिहिला. तर वारकरी परंपरेचा पाया असणारे संत ज्ञानदेव हे पैठण जवळच्या आपेगावचे. नंतरच्या काळात संत नामदेव, संत रामदास, संत एकनाथ, गोरा कुंभार, महदंबा यांनी संतपरंपरेत मोलाची भर घातली.’’
डॉ. विजय फुलारी, कुलगुरू,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ