

Chhatrapati Sambhajinagar News
esakal
छत्रपती संभाजीनगर: महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन होऊन एक महिना उलटला असताना आता प्रत्येक पक्षाला दालनासाठी हक्काची जागा हवी आहे. त्यामुळे महापौरांकडे दालनासाठी तगादा सुरू आहे. ज्या पक्षाचे पदाधिकारी नाहीत, त्या पक्षाला दालन देण्यासाठी महापौरांना कसरत करावी लागत असून, मुख्यालयात असलेली कमी जागा आणि दालनावर होणारा खर्च ही प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे.