A drought-hit farm in Murumkheda, Chhatrapati Sambhajinagar, highlighting the agricultural crisis faced by the farmer family
esakal
छत्रपती संभाजीनगर: ‘‘कर्ज काढून, हातउसनं करून सोयाबीन पेरलं, मल्चिंगवर मिरची बी लावली, मका पिरली. मह्या पोराचा शेतीवर लय जीव; पण पेरलेल्या पिकातलं हातात काही आलं नाही, उलट दुष्काळानं माझा लेक नेला! जिथं सोयाबीन हुतं, तिथंच लेकाला अग्नी दिला. आता त्याची राख उडती आन त्ये बगून काळीज फाटत जातं हो...