छत्रपती संभाजीनगर - राज्य पुरातत्त्व विभागातर्फे ऐतिहासिक मकई गेटच्या संवर्धनाचे काम सुरू होणार असून हा दरवाजा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाषाणातील हा दरवाजा मुघल वास्तूशैलीचे उत्तम उदाहरण असला तरी दरवाजा बंद असल्याने सर्वसामान्यांचा मात्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय.