Chhatrapati Sambhajinagar Crime
esakal
अंमलदाराच्या पत्नी सबा समीर शेख हिने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.
पती व सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी
छत्रपती संभाजीनगर : पती व सासरकडील मंडळींच्या छळाला कंटाळून पोलिस अंमलदाराच्या पत्नीने (Police Officer Wife) तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर पोलिस (Chhatrapati Sambhajinagar Police) आयुक्तालयातील वसाहतीत गुरुवारी सकाळी घडली. या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाइकांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेत पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. घटनेमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.