Sambhajinagar Police Action : छत्रपती संभाजीनगरमध्ये कुख्यात गुंड सय्यद फैसल ऊर्फ तेजाची पोलिसांनी धिंड काढली. प्रेयसीवर गोळी झाडल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर: तुरुंगातून आल्या-आल्या प्रेयसीवर गोळी झाडणारा आणि आणखी तीन-चार मुलींना ठार मारणार असल्याची धमकी देणारा कुख्यात गुंड सय्यद फैसल ऊर्फ तेजा (वय ३०, रा. किलेअर्क) याची बुधवारी (ता. १३) पोलिसांनी शहरात धिंड काढली.