

Chhtrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: शहरासह परिसरात झालेल्या जोरदार वादळी पावसाने महावितरणच्या यंत्रणेची दाणादाण उडवली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून वीज वाहिन्यांवर पडल्याने ट्रान्सफॉर्मर आणि फिडर बंद पडले. याचा मोठा फटका बसून वाळूजपासून ते हर्सूलपर्यंत आणि नक्षत्रवाडीपर्यंतच्या सुमारे ७० टक्के शहरात गुरुवारी (ता. १९) रात्री अंधार होता.