

Grand Book Festival in Chhatrapati Sambhajinagar from January 17
Sakal
छत्रपती संभाजीनगर : ‘सकाळ’, छत्रपती संभाजीनगर महापालिका, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे येथे १७ ते २० जानेवारीदरम्यान ‘सकाळ पुस्तक महोत्सव’ होणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. या महोत्सवात असंख्य पुस्तकांचे भांडार तर असेलच शिवाय खुला मंच, खुले कविसंमेलन, निमंत्रितांचे कविसंमेलन, कवयित्रींचे संमेलन, कथाकथन, परिसंवाद आदी कार्यक्रमांचीही मेजवानी मिळेल.