

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी घेण्यासाठी गुढी पाडव्याला गुरुवारी (ता. १९) एक टप्पा पूर्ण झाला. नाथसागरातील उपसा विहिरीत (जॅकवेल) पाणी घेण्यासाठी सायफन पद्धतीचा वापर करण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ऐतिहासिक वारसा अन् आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम करत या प्रणालीचा प्रयोग यशस्वी केला. त्यामुळे उपसा विहिरीभोवती तयार करण्यात आलेला कॉफर डॅम (मातीचा बंधारा) फोडण्यापूर्वी पाण्याची चाचणी घेता आली. तथापि, प्रत्यक्ष नळाला पाणी येण्यासाठी किती दिवस लागतील, हा प्रश्न कायम आहे.