

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: पावसाळा सुरू होताच शहराच्या विविध भागांतील रस्त्यांवर चिखलच चिखल झाला. ‘स्मार्ट सिटी’चा गवगवा चिखलात फसला असून, रस्त्यांची अवस्था खेड्यापेक्षाही वाईट झाली. राज्य शासनाने वेळोवेळी दिलेला निधी, महापालिका फंड आणि स्मार्ट सिटीतून कोट्यवधी रुपये खर्च करून गुळगुळीत करण्यात आलेल्या रस्त्यांची पाणीपुरवठा, ड्रेनेज योजनेच्या कामासाठी फोडाफोडी करण्यात आली. हे रस्ते पूर्ववत करण्याची कंत्राटदाराची जबाबदारी असताना महापालिकेच्या आशीर्वादाने कंत्राटदारचे ‘कल्याण’, तर नागरिकांचे हाल सुरू आहेत. महापालिका आयुक्त अमोल येडगे मात्र केबिनमध्ये बसून नागरिकांची कसरत पाहत आहेत.