छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसर हादरला आहे. झोपेत असलेल्या १३ वर्षीय मुलीच्या अंथरुणात विषारी साप शिरला (Snakebite Incident Karnpura) आणि त्याने दंश केला. या सर्पदंशामुळे मुलीचा मृत्यू झाला असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास कर्णपुरा परिसरात घडली.