Chhatrapati Sambhajinagar
sakal
छत्रपती संभाजीनगर
Chhatrapati Sambhajinagar: चक्क उपमहानिरीक्षकांनाच उठवावे लागले खासगी व्यक्तीला; दुय्यम निबंधक कार्यालयात दुसऱ्या दिवशीही प्रकार
Sub Registrar Office: छत्रपती संभाजीनगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खासगी व्यक्ती आणि दलालांचा सुळसुळाट उघडकीस आला. उपमहानिरीक्षक विजय भालेराव यांनी कार्यालयाची झाडाझडती करून अधिकारी व दलालांची कानउघडणी केली.
छत्रपती संभाजीनगर : मुद्रांक, नोंदणी विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयात खासगी व्यक्तींसह दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. खासगी व्यक्तींची मजल थेट दुय्यम निबंधक कार्यालयाचा ताबा घेण्यापर्यंत पोचल्याने मुद्रांक, नोंदणी विभागाचे उपमहानिरीक्षक विजय भालेराव यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत दुसऱ्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालयात सायंकाळी सहादरम्यान फेरफटका मारला.

