

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संंभाजीनगर: शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मंगल कार्यालय, घर आणि दुकानांना चोर लक्ष्य करीत आहेत. मागील चार दिवसांत विविध भागांतील घटनांमध्ये सोन्याचे दागिने, रोकड आणि लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीस गेले. या प्रकरणांमध्ये संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंद झाले.
परिसरातील एका मंगल कार्यालयातील लग्न सोहळ्यातून एक लाखाचे सोन्याचे गंठण आणि १८ हजार ७०० रुपये रोख असा मुद्देमाल चोरांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी (ता. एक) घडली.