Seventy-three-year-old Rama Dabhade takes the ULLAS literacy examination at Wadgaon Kolhati in Chhatrapati Sambhajinagar district.
esakal
छत्रपती संभाजीनगर, : शिक्षणाला वयाचे बंधन नसते, याचा प्रत्यय रविवारी (ता. २५) जिल्ह्यातील साक्षरता परीक्षेदरम्यान आला. वयाच्या ७३ व्या वर्षी आजीबाईंनी साक्षरतेसाठी परीक्षा दिली, तर काही आजी-आजोबा नातवंडांना सोबत घेऊन परीक्षा केंद्रांवर दाखल झाले. ‘उल्लास’ नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४१ हजार ९३६ निरक्षरांनी वाचन, लेखन आणि संख्याज्ञानाचे मूल्यमापन करणारी ही परीक्षा दिली. या परीक्षेच्या निमित्ताने वयावर मात करणारी शिकण्याची जिद्द आणि साक्षरतेची ओढ अधोरेखित झाली.