
Accident News
Esakal
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील श्रीरामपूर–वैजापूर रस्त्यावर हा भीषण अपघात घडला. वैजापूरहून लाडगावच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या हायवाने, श्रीरामपूरकडून वैजापूरकडे येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडकेनंतर मोटारसायकलस्वार हायवाच्या चाकाखाली आल्याने बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला.