

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: शहरातील वाळूज परिसरातील एका युवकाची केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने गरुवारी (ता. २९) तब्बल नऊ तास चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे आठ ते १० बनावट आधार कार्ड आढळले. यावरून तो बनावट आधार कार्ड तयार करत असल्याचा संशय असून त्याच्या मोबाइलवरून परदेशात पैशांची देवाणघेवाण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.