

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: शहराच्या २,७४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेच्या मुख्य २,५०० मिलिमीटर व्यासाच्या पाइपलाइनची चाचणी सुरू करण्यात आली. तीन दिवसांपूर्वी शुक्रवारी (ता. २९) कारकीनजवळ मुख्य जलवाहिनीच्या जोडणीची वेल्डिंग निखळल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर सुरू करण्यात आलेले वेल्डिंगचे काम सोमवारी (ता. ३०) रात्री पूर्ण झाले. त्यानुसार मंगळवारपासून (ता. ३१) जलवाहिनीची चाचणी सुरू केली जाणार आहे.