Chhatrapati Sambhajinagar: बघा, पाणी आलंय! गोदामाय अंगणात आल्याचा आनंद; 20 वर्षांची प्रतीक्षा संपली, महिन्याभरात नळाला पाणी

Nakshtarwadi Water Treatment Center Welcomes Supply: छत्रपती संभाजीनगरात नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रातून शहरातील नळाला पाणी आले. वर्षांनंतर १७ लाख नागरिकांच्या प्रतीक्षेला शेवट, २०० एमएलडी पाण्याचा प्रवाह सुरू.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: दुपारचं ऊन. तहानेनं जीव कासावीस होईल अशा उष्ण झळा. अशात दोनचा गजर झाला अन् अथांग नाथसागराचं गोड पाणी ३८ किलोमीटरचा प्रवास करीत शहरात आलं. वर्षानुवर्षे तहानेनं आसुसलेल्या डोळ्यांनी हे पाणी नुसतं पाहिलंच नाही, तर सर्वांगात भरून घेतलं अन् रणरणतं ऊनही क्षणभर सारे विसरून गेले. नक्षत्रवाडीच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोचताच फटाक्यांच्या आतषबाजीत जलपूजन करण्यात आले, त्याचवेळी ‘हर हर महादेव’चा जयघोष करीत जणू गोदामायच अंगणात आल्याचा आनंदही साजरा करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com