

Chhatrapati Sambhajinagar
esakakl
छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषदेच्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या प्रशासकीय इमारतीला लोकार्पणापूर्वीच तडे गेले. यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवरच ठेकेदाराविरोधात तातडीने चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्याकडे केली.