औरंगजेबाची कबर हैदराबादला घेऊन जा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mla Sanjay Shirsat

छत्रपती संभाजीनगर या नावाच्या समर्थनार्थ सोमवारी (ता.६) तापडिया नाट्य मंदिरात सकल हिंदू एकीकरण समितीची बैठक झाली.

MLA Sanjay Shirsat : औरंगजेबाची कबर हैदराबादला घेऊन जा!

छत्रपती संभाजीनगर - ‘आता आमचं राज्य आहे, अब वही होगा जो हम चाहेंगे, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करणाऱ्या एमआयएमने खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर काढून हैदराबादला घेऊन जावी’, असे आव्हान आमदार संजय शिरसाट यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर या नावाच्या समर्थनार्थ सोमवारी (ता.६) तापडिया नाट्य मंदिरात सकल हिंदू एकीकरण समितीची बैठक झाली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी बोलावलेल्या या बैठकीस सहकारमंत्री अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शिरसाट म्हणाले, की जनतेची भावना विचारात घेऊनच सरकारने शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केले आहे. त्यांना औरंगजेबाचा एवढाच पुळका असेल तर त्यांनी खुलताबादेतील औरंगजेबाची कबर उचलून हैदराबादेत घेऊन जावी आणि सकाळ, संध्याकाळ त्याच्या पाया पडावे. तिकडे अमेरिकेने लादेनला मारुन समुद्रात टाकले. अमेरिकेने त्याची कबर होऊ दिली नाही. याविरोधात आपण जागरुक राहिले पाहिजे, असे आवाहनही शिरसाट यांनी केले.

मी सरकारचा प्रतिनिधी असल्याने मला बोलायला काही मर्यादा आहेत. पण शहराच्या नामांतराच्या विषयावर आपल्यासोबत कुठेही यायला तयार आहे. औरंगजेब हा निष्ठूर आणि क्रूर होता. त्याने स्वत:च्या आई, वडिलांना आणि मुलालाही त्रास दिला होता. त्यामुळे त्याच्या नावाचा शहरासाठी आग्रह धरणे चुकीचे आहे, असे सहकारीमंत्री अतुल सावे म्हणाले. आता छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर फॉर्म भरुन विभागीय आयुक्त कार्यालयात जमा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले.