

Sambhajinagar News
esakal
छत्रपती संभाजीनगर: ‘नोंदणी करा, घरपोच गॅस सिलिंडर येईल, अफवांवर विश्वास ठेऊ नका, पुरेसा साठा आहे’ असे प्रशासन पातळीवर सांगितले जात असले तरी ग्राहकांना वेळेत तो मिळत नाही, एजन्सीसमोरील रांगा काही कमी होताना दिसत नाहीत. दुसरीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे हॉटेलचालक, खानावळी, वसतिगृहचालक अडचणीत आले आहेत. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. प्रशासनातर्फे छापे टाकून व्यावसायिक वापरातील घरगुती सिलिंडर जप्त केले जात आहेत.