esakal | इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची हिंगोलीत सायकल रॅली
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची हिंगोलीत सायकल रॅली

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली: पेट्रोल, डिझेलच्या भावामध्ये झालेली प्रचंड वाढ, त्याचबरोबर घरगुती गॅसच्या किमतीसह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किंमती. या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाच्या वतीने आक्रमक भूमिका घेत केंद्र शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करीत हिंगोलीत जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. १२) निषेध आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस पक्षाच्या वतीने हिंगोली येथे महागाई विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. शहरातून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल रॅली काढण्यात आली. दरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून सर्वसामान्य जनतेच्या भावना व्यक्त केल्या. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ रद्द करा, इंधन दरवाढ कमी करा नाहीतर खुर्च्या खाली करा, 'बहुत हुई महंगाई की मार बस भी करो मोदी सरकार', केंद्र सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता.आंदोलनात युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेसच्या पदधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

हेही वाचा: 'पटोलेंनी माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घ्यावी, मग बोलावे'

यावेळी शहराध्यक्ष बापुराव बांगर, तालुकाध्यक्ष शामराव जगताप, माजी नगराध्यक्ष सुधीर अप्पा सराफा, युवक काँग्रेस जिल्हा प्रभारी गणेश वाघमारे, माजी जिल्हा परिषद सदस्य सदस्य गजानन देशमुख, नगरसेवक अनिल नेनवाणी, काँग्रेस प्रवक्ता विलास गोरे, डॉ.राजेश भोसले, माबुद बागवान, आरेफ लाला, मुजिब कुरेशी, विशाल घुगे, सुदाम खंदारे, जिल्हा कार्याध्यक्ष ऋषिकेश देशमुख, एकनाथ शिंदे, आबेदअली जहागीरदार, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष जुबेर मामु, युवक अध्यक्ष बंटी नांगरे, गजानन सोळंके, सुधीर राठोड, पुष्पक देशमुख बालाजी कर्डीले, विठ्ठल जाधव, श्रीराम जाधव पारिस्कर, दत्ता भवर, विशाल वायकुळे, लक्ष्मण यादव, गजानन कवडे, अजय बांगर, अविनाश चव्हाण, अक्षय डाखोरे, गजानन बांगर, संतोष साबळे, कृष्णा बांगर, शुभम शिंदे, विजय सांगळे उपस्थित होते.

loading image