
छत्रपती संभाजीनगर : नवीन योजनेतून शहरवासीयांना ऑक्टोबरमध्ये पाणी देणारच, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. खुद्द मंत्रालयात सर्व यंत्रणांच्या बैठकीत त्यांनी हा शब्द दिला होता. प्रत्यक्षात आज फारोळ्याला जलपूजनाला आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या शब्दांवर पाणी फिरवित ऑक्टोबरऐवजी डिसेंबरची तारीख दिली. त्यामुळे पाणीटंचाईने आधीच त्रासलेल्या शहरवासीयांना सुरळीत पाण्यासाठी आणखी चार महिने वाट पाहावी लागणार आहे.