esakal | आंधळ दळतयं आणि कुत्रं खातयं, चित्रा वाघ यांची गृहखात्यावर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh News

आंधळ दळतयं आणि कुत्रं खातयं, चित्रा वाघ यांची गृहखात्यावर टीका

sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद : बीडमधील Beed दिंद्रूड गावी शेतात काम करणाऱ्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केले गेली. विरोध करताच मारहाण झाली. आता पीडितेच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केलाय. राज्यात आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय ही अवस्था पोलिस दलाची झालीये, अशी घणाघाती टीका भाजपच्या BJP नेत्या चित्रा वाघ यांनी गृहखात्यावर केली. आज मंगळवारी (ता.१३) त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्यात वाघ म्हणतात, की पीडितेच्या कुटुंबीयानाच कोठडीत उभ केल जातयं. विकृत हे कोणाचे आदर्श घेत आहेत. रोज या सरकारमधील प्रत्येक पक्ष आमचे पाच वर्ष सत्ता टिकेल अशी टिमकी वाजवत असतात, अशा शब्दांत चित्रा वाघ Chitra Wagh यांनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला.chitra wagh attack on state home ministry for crime against women

हेही वाचा: दानवे अन् कराडांची आगळी-वेगळी मैत्री, बैलगाडीतून प्रवास!

काल या बाईने (पीडित महिला) टाहो फोडून सांगितल, ते शब्द तुमच्या अंतकरणापर्यंत पोहोचत नाहीत. तुम्हाला तिच्या आश्रूंची किमत नाही. संवेदना सगळ्या संपल्या. महाराष्ट्र Maharashtra पहिल राज्य असेल जिथे राज्यकर्त्यांवरती राज्यातील महिलांनी बलात्काराचे आरोप केले आहेत. हेच सर्व आदर्श घेऊन विकृती दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. बलात्कार झाले तरी तक्रारी, एफआयआर दाखल होत नाहीत. तुम्हाला भांडावे लागतयं, असे महाविकास आघाडीच्या सरकारला उद्देशून वाघ बोलल्या.

loading image