Cidco Bus Stop : हे सुस्त म्हणून ते मस्त! सिडको बसस्थानक परिसरात ‘मौत का कुआँ’

येणारे प्रत्येक पोलिस आयुक्त म्हणतात, ‘वाहतुकीला शिस्त लावणार’ आणि जाताना म्हणतात ‘आम्ही वाहतुकीला शिस्त लावण्यास कमी पडलो.’
Sidko Chowk Bus Stop
Sidko Chowk Bus Stopsakal

- विजय देऊळगावकर

छत्रपती संभाजीनगर - शहरात वाहतूकव्यवस्थेचा पार खेळखंडोबा झाला आहे. येणारे प्रत्येक पोलिस आयुक्त म्हणतात, ‘वाहतुकीला शिस्त लावणार’ आणि जाताना म्हणतात ‘आम्ही वाहतुकीला शिस्त लावण्यास कमी पडलो.’ बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी काही उपाययोजना केल्या, तरच शिस्त लागेल ना! शहरात वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महत्त्वाच्या चौकांत सतत वाहतूक कोंडी होत आहे.

बेशिस्त, अवैध वाहनचालकांची मनमानी सुरू आहे. सामान्य वाहनधारक मात्र बेशिस्त वाहतुकीमुळे जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडतात. चौकाचौकांत ‘मौत का कुँवा’मध्ये वाहन चालविल्यासारख्या भावना वाहनचालकांच्या आहेत. ‘वाहतूक शाखा सुस्त, अवैध वाहनचालक मस्त’ असेच चित्र शहरात दिसून येत आहे. शहरातील बेशिस्त वाहतुकीवर प्रकाश टाकणारी ही ‘सकाळ’ची विशेष मालिका.

कायम वर्दळ

शहरातील प्रमुख असलेल्या जालना रोडवरील उड्डाणपुलाखाली सिडकोत वसंतराव नाईक चौक आहे. बसस्थानकाजवळ अत्यंत वर्दळीचा असलेल्या या चौकातून एक मार्ग सेव्हन हिलकडून मुकुंदवाडीकडे जातो, तर दुसरा मार्ग कामगार चौकाकडून जळगाव रोडकडे जातो. या चौकाच्या जवळच सिडको बसस्टँड आहे. या बसस्टँडमधून दररोज शेकडो एसटी महामंडळाच्या बसची वाहतूक होते. येथे प्रवाशांची संख्या जास्त असल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि काळीपिवळी वाहनांसाठी हा चौक ‘थांबा’च बनला आहे.

हे ठरू शकतात उपाय

  • प्रवासी रिक्षांना ठराविक थांबा निश्चित करून देणे.

  • चौकाच्या मध्यभागी रिक्षा उभा केल्यास दंड करणे.

  • पुन्हा तीच चूक केल्यास परवाना रद्दची कारवाई करणे.

  • चौकात मद्यपी वाहनधारकांची तपासणी करून कारवाई.

  • सर्व्हिस रोडवर काळी-पिवळीचालकांवर कारवाईची मोहीम.

  • चौकात वाहतूक पोलिसांची संख्या पुरेशी वाढविणे.

सिडको चौकात वाहतूक नियमनासाठी वाहतूक पोलिस देण्यात आलेले आहेत. मात्र, सध्या पोलिस भरतीमुळे पोलिस व्यस्त आहेत. सध्या या ठिकाणी होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. चौकात वाहतुकीला काहीही अडथळा आल्यास आम्ही स्वतः लक्ष घालून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील राहू.

- राजेश मयेकर, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सिडको विभाग.

रिक्षा, काळीपिवळी जुगाराचे अड्डे

प्रवासी घेण्यासाठी चौकात; तसेच सर्व्हिस रोडवर रिक्षा, काळीपिवळी वाहने उभी असतात. यापैकी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाहनधारकांनी वाहनातच पत्त्याचे जुगार अड्डे सुरू केले आहेत. रिक्षाचा आडोसा करून काळीपिवळी वाहनांत चालक व त्यांचे साथीदार सर्रास जुगाराचा डाव भरवितात. सिडको पोलिसांनी अशा रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे. सिडको एमआयडीसी पोलिसांनी काळीपिवळीमध्ये जुगार खेळणाऱ्या चिखली, बुलडाणा येथील काही जणांना अटक केलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com