

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: चौक म्हटला म्हणजे वाहतूक नियमन, शिस्त आणि सुरक्षितता अपेक्षित असते. वसंतराव नाईक चौकात (सिडको चौक) याचा काही संबंध राहिलेला नाही, असे चित्र गेल्या काही दिवसांपासून आहे. खोदून झाल्यावर कामचलाऊ भराव टाकलेल्या रस्ता पार चिखलात गेला आणि जीवघेणे खड्डे पडले. त्यामुळे वाहनधारकांना महापालिकेच्या कारभारावर चिखलफेक करीत, जीव मुठीत घेऊन मार्गस्थ व्हावे लागत आहे. चिखल, खड्ड्यांचाच सिग्नल झाल्याने कृत्रिम सिग्नलची गरजच उरलेली नाही. साऱ्या शहराशी संबंध असलेल्या या महत्त्वाच्या चौकातील दुरवस्थेबद्दल यंत्रणेला काहीच कसे वाटत नाही? असा उद्विग्न सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.