
Crime News
sakal
सिडको परिसरात नात्यातील मुलीसोबत प्रेमविवाह केल्याच्या वादातून हल्ला.
संशयित मुजम्मिल पठाणला पोलिसांनी अटक केली.
जखमी युवकावर उपचार सुरू असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
सिडको : नात्यातील मुलीशी प्रेमविवाह केल्याचा वाद सिटी चौक पोलिसापर्यंत गेला. त्यानंतर ‘तडजोड करू’ म्हणत एकाला दुचाकीवर बसवून नेत पोट, छाती आणि खांद्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. एमजीएम दवाखान्यासमोरील रस्त्यावर शनिवारी (ता. २७) सायंकाळी सहाला ही घटना घडली.