esakal | सिडको वाळूज महानगर येणार महापालिकेत!अभ्यासासाठी संयुक्त समिती
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Municipal Corporation News

सिडको वाळूज महानगर येणार महापालिकेत!अभ्यासासाठी संयुक्त समिती

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : महापालिकेची (Auragnabad Municipal Corporation) पुन्हा हद्दवाढ करण्यासाठी काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यात आता सिडको वाळूज महानगर प्रकल्प-१ मधील सोयी-सुविधांचा अभ्यास करण्यासाठी सिडको (Cidco) व महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती ४५ दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीमुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या हद्दवाढीविषयी चर्चा सुरू झाली आहे. महापालिकेची पाच वर्षापूर्वी हद्दवाढ करण्यात आली होती. त्यावेळी सातारा-देवळाई परिसर महापालिकेत समाविष्ट करण्यात आला. आता गेल्या काही दिवसांपासून हद्दवाढीची चर्चा सुरू आहे. बांधकाम व्यवसायिकांची संघटना क्रेडाईने वाळूज महानगरसह (Waluj Mahanagar) संपूर्ण परिसर महापालिकेत घेण्याची मागणी केली.

हेही वाचा: पैठण तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

दरम्यान राज्य शासनाकडून पोलिस आयुक्तांच्या हद्दीपर्यंत महापालिकेची हद्द करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रस्ताव देखील तयार करण्यात आला होता. दरम्यान महापालिकेचे प्रशासक, तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पुढाकार घेतला आहे. सिडकोने बजाजनगर भागात वाळूज महानगर-१ प्रकल्प पूर्ण केला आहे. दरम्यान नगर-१, नगर-२ व नगर-४ महापालिकेकडे हस्तांतरण करून घेण्याचा विचार केला जात आहे. सिडकोने नगर-१ व नगर-२ विकसित केले आहे. तसेच नगर-४ साठीचे क्षेत्र संपादीत केले आहे. त्यानुसार या भागातील रस्ते, खेळांची मैदाने, मोकळ्या जागा, जमीनी, जलनि:सारण योजना, विद्युत वाहिन्या, पथदिवे, सार्वजनिक स्वच्छतागृहे, ईएसआर, जीएसआर, पंपगृहे, सभागृहे याची माहिती संकलीत करून त्याचे मूल्यांकन करणे तसेच या सुविधांच्या देखभाल दुरुस्तीसह आवश्यकतेनुसार पुनर्विकास करण्यासाठी अपेक्षित ढोबळ खर्च काढणे या कामासाठी सिडको व महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे.

हेही वाचा: बिलोली तहसीलमधील कारकूनाला दोन हजार रुपये घेताना पकडले

या अधिकाऱ्यांचा समावेश
समितीमध्ये सिडको कार्यालयातील प्रशासक भुजंग गायकवाड, मुख्य नियोजनकार रमेश डेंगळे, भू-मूल्यांकन अधिकारी प्रगती चौंढेकर, वरिष्ठ नियोजनकार निर्मलकुमार गोलखंडे, कार्यकारी अभियंता जे. ए. शेख, सहायक वसाहत अधिकारी गजानन सातोटे, भूमापक माधव सूर्यवंशी यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, शहर अभियंता सखाराम पानझडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय पवार, उपसंचालक जयंत खरवडकर, कार्यकारी अभियंता संजय काकडे, बी. डी. फड, उपायुक्त अपर्णा थेटे यांचा समावेश आहे.

loading image
go to top