छत्रपती संभाजीनगर - शहराच्या पाण्याच्या संदर्भात सकाळने तब्बल दिड महिना लावून धरलेल्या ‘कुठेय पाणी’ या मालिकेने शहरातील नागरीक जागरुक झाले आहेत. सकाळच्या पुढाकाराने नागरीकांनी नागरीकांसाठी पुकारलेल्या आंदोलनात शहरातील सर्वच क्षेत्रातील उच्चभ्रू ते आगदी सामान्यांपर्यंत नागरीकांनी आंदोलनात ठिय्या दिला. राजकीय पुढारी, प्रशासकीय अधिकारी सगळे एकाच माळेचे मणी म्हणत नागरीकांनी पालथ्या घागरीवर पाणी टाकत आपला संताप व्यक्त केला.