Electric Vehicle : इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे नागरिकांची पाठ; फक्त १६ हजार ३१९ वाहने रस्त्यावर

भारतीय इलेक्ट्रिक वाहन उद्योगाने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये विविध प्रकारच्या वाहनांची रेकॉर्डब्रेक विक्री केली आहे.
Electric Vehicle
Electric Vehiclesakal

- परवेज खान

छत्रपती संभाजीनगर - इलेक्ट्रिक वाहनांवर सरकारकडून देण्यात येत असलेली सबसिडी बंद करण्यात आली आहे. तरीही देशभरात इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांचा कल कमी दिसून येत आहे. आरटीओ कार्यालयातील नोंदीनुसार जिल्ह्यात १६ हजार ५१९ एवढीच इलेक्ट्रिक वाहनांची संख्या आहे.

२०२४ या आर्थिक वर्षात या वाहनांची विक्री जोरदार वाढली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय इलेक्ट्रिक वाहन उद्योगाने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये विविध प्रकारच्या वाहनांची रेकॉर्डब्रेक विक्री केली आहे. एकट्या मार्चमध्ये १ लाख ९७ हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत भारतात १६, लाख ६५ हजार २७० इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करण्यात आली.

परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल कमीच असल्याचे वाहन खरेदीवर आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी वाहनांची संख्या जवळपास १४ लाख एवढी आहे. त्याच्या मुकाबल्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या फारच कमी असल्याचे आरटीओ कार्यालयातील नोंदीनुसार दिसून येत आहे.

खरेदीकडे या गोष्टींमुळे कल थांबला

  • इलेक्ट्रिक वाहनांची किंमत जास्त.

  • बॅटरीची किंमत जास्त.

  • बॅटरी जळण्याची कारणे वाढली.

  • वाहनांची रिसेल होत नाही.

  • चार्जिंगची समस्या.

ई-वाहनांची संख्या

  • दुचाकी - १० हजार ८६

  • कार - ७७९

  • मोपेड - ४ हजार ५८३

  • ई-रिक्षा (पी) - ५३

  • ई-रिक्षा कार्ट जी - ३७२

  • गुड्स करिअर - १८

  • थ्रीव्हीलर (गुड्स) - २४८

  • थ्रीव्हीलर (पॅसेंजर) - ३४९

  • फॉर्क लिफ्ट - २१

  • थ्रीव्हीलर (पर्सनल) - ५

  • ट्रेलर - १

  • कमप्रेशर - १

  • जनरेट, रिंग - २

  • मोटार कॅब - १

  • एकूण - १६,५१९

वाहनांच्या किमती जास्त असून बॅटरीही महाग आहे. लाखो रुपयांच्या दुचाकी, चारचाकी खरेदी करून चार्जिंगमध्ये वेळ घालवावा लागतो. तसेच या वाहनांना रिसेल नसल्यामुळे ग्राहक वाहन खरेदी करण्याकडे दहा वेळेस विचार करत आहे. त्याचा परिणाम खरेदीवर दिसून येत आहे.

- सय्यद चाँद, संस्थापक अध्यक्ष, औरंगाबाद मेकॅनिक असोसिएशन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com