chhatrapati sambhajinagar city bus
sakal
छत्रपती संभाजीनगर - शहराचा झपाट्याने विस्तार होत असून, लोकसंख्या १७ लाखांवर पोचली. पण, पायाभूत सुविधांची वानवा आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार पुणे, मुंबईच्या धर्तीवर ४०० शहर बसची गरज आहे. सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत केवळ १०० बस उपलब्ध आहेत. यातील बहुतांश बस सात वर्षे जुन्या झाल्याने बंद असतात. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने रिक्षांमधून प्रवास करावा लागतो. ३५ ई-बस व १०० पीएम बसची प्रतीक्षा कायम आहे.