

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: सर्वच पक्षांच्या नेत्यांनो, तुम्ही तब्बल २० वर्षे शहरवासीयांना ‘पाणी... पाणी...’ करायला लावले. तुम्ही केलेले ‘पाप’ इतके आहे, की पवित्र गोदामाईच्या पाण्याने ते धुऊन काढावे लागत आहे आणि त्यासाठी थोडेथोडके नव्हे, तर तब्बल २५ कोटी लिटर पाणी वाया घालवावे लागणार आहे! ३८ किलोमीटरची नवी जलवाहिनी धुण्यासाठी ही कसरत करावी लागत आहे.