Congress News : पैठणमध्ये निवडणूकीत काँग्रेसचेच दोन गट भिडले! हाणामारीत एक गंभीर जखमी

Clashes between 2 factions of Congress in paithan Market Committee election on seriously injured
Clashes between 2 factions of Congress in paithan Market Committee election on seriously injured
Updated on

छत्रपती संभाजीनगर : पैठणच्या बाजार समितीच्या निवडणूकीवरून दोन गटात हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या निवडणूकीत काँग्रेमध्येच दोन गट भिडल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी झालेल्या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या दोन गटांपैकी एक गट हा महाविकास आघाडीच्या सोबत असून दुसरा स्वतंत्र गट पडल्याने वाद निर्णाण झाला. या दोन गटांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीवरून वाद झाला. यावेळी आक्षेपार्ह शब्दात टीका केल्यामुळे या दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. ज्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Clashes between 2 factions of Congress in paithan Market Committee election on seriously injured
Jammu Kashmir Terror Attack : कारगिल युध्दात पिता, मुलाचं पूंछमध्ये बलिदान; आईला म्हणाला होता…

साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसचा एक गट महाविकास आघाडीसोबत आहे. तर दुसरा गट स्वतंत्र पॅनल तयार करून निवडणुकीत उतरला आहे. यात प्रचारासाठी शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे उमेदवार बाबासाहेब पवार, निवृत्ती पोकळे, ज्ञानेश्वर पवार हे इंदेगावमध्ये गेले होते. त्यावेळी दोन्ही गटात वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारी झाली.

Clashes between 2 factions of Congress in paithan Market Committee election on seriously injured
Viral Video : सामन्यानंतर भरली धोनी मास्तरांची शाळा; हैद्राबादच्या खेळाडूंनी घेतलं ज्ञान

काँग्रेसचे विनोद तांबे, राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या समर्थकांनी धारदार शास्त्राने हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या हल्ल्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com