11th Education News : अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत पुन्हा गोंधळ ! विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा बसतोय फटका
11th Online Admission Delay : महाराष्ट्राच्या अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणी येत असून पालक व विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. संकेतस्थळ पुन्हा संथ व अपूर्ण कार्यक्षम आहे.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाला असून, संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी व पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.