

Chhatrapati Sambhajinagar
esakal
पाचोड: उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागताच सर्वत्र थंड पाण्याची गरज भासू लागली आहे. पिण्याच्या पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी सध्या ‘वॉटर प्युरिफायर’सारख्या आधुनिक यंत्रांचा वापर वाढत असला, तरी ग्रामीण भागात मातीच्या माठांची ओढ आजही कायम आहे. पाचोडच्या आठवडे बाजारासह ठिकठिकाणी मातीच्या माठांना मोठी मागणी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.