
छत्रपती संभाजीनगर : शहर परिसरात ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे नारेगाव, पिसादेवी, पळशी, कुबेर गेवराई गावासह परिसरात शुक्रवारी (ता. १५) रात्री एकच हाहाकार उडाला. नारेगावात शेकडो घरे, व्यावसायिक मालमत्तांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला. दुचाकी, चारचाकी वाहने पाण्यात बुडाल्याने नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.