esakal | Aurangabad : औरंगाबादेत दिवसभरापासून ढगाळ वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

ढगाळ हवामानामुळे सूर्यदर्शन झाले नाही.

Aurangabad : औरंगाबादेत दिवसभरापासून ढगाळ वातावरण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : गेल्या दोन दिवसांपासून शहरात (Aurangabad) ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सूर्यनारायणाचे दर्शन झालेले नाही. गुरुवारी (ता.२२) सकाळी काही वेळ हलकासा पाऊस (Rain) झाला. बुधवारी (ता.२१) शहरात दिवसा व रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरु होता. अनेक ठिकाणी पाणी साचले होते. जिल्ह्यात यामुळे पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.(cloudy weather whole day in aurangabad glp88)

हेही वाचा: PHOTO - पावसाचं रौद्ररुप; चिपळूणात ढगफुटी, जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यातील पैठणमधील सकाळपासून पाचोड परिसर, आडूळ, रजापूर, पांरडी, कडेठाण, एकतुनी, ब्राह्मणगाव, गेवराईसह रिमझिम पाऊस होत आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतातील मशागतीचे कामे खोळंबली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

loading image